मसूरे | प्रतिनिधी : कांदळगाव येथील जुन्या
पिढीतील भजनी बुवा, प्रगतशील शेतकरी व ज्येष्ठ ग्रामस्थ रमाकांत राजाराम पारकर (९३) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मसुरे देऊळवाडा शाळेचे मुख्याध्यापक • प्रशांत पारकर, ओझर विद्यामंदिरचे शिक्षक प्रवीण पारकर, ग्रामपंचायत सदस्य संतोष पारकर व मालवणी बाजारचे कर्मचारी राजेंद्र पारकर यांचे वडील होत.











