पोस्टाच्या कामासाठी घराबाहेर पडलेला ४५ वर्षीय व्यक्ती बेपत्ता 

 

तालुक्यातील हर्चे पवारवाडी येथील घटना 

 लांजा (प्रतिनिधी) पोस्टाच्या कामासाठी बाहेर घराबाहेर पडलेला ४५ वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाल्याची घटना लांजा तालुक्यातील हर्चे येथे घडली आहे. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे .

याबाबतची फिर्याद राजेश यशवंत पवार (वय ५२, राहणार हर्चे पवारवाडी) यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिली आहे .जयप्रकाश यशवंत पवार (वय ४५ वर्षे, राहणार हर्पचे वारवाडी) हा दिनांक १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्याने आपल्या हर्चे पवारवाडीतील घरातून पोस्टाचे कामा करता बाहेर पडला होता. मात्र तो पुन्हा घरी न परतल्याने त्याचा भाऊ व कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. नातेवाईक व आजुबाजूच्या लोकांकडे चौकशी करून देखील तो सापडू न शकल्याने जयप्रकाश पवार हा बेपत्ता झाल्याची फिर्याद लांजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .

संबंधित व्यक्ती कोणाला आढळून आली असता लांजा पोलीस ठाण्याशी ०२३५१-२३००३३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन लांजा पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे .याबाबत अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल टी.एस. मोरे हे करत आहेत.