मंडणगड – प्रतिनिधी : मंडणगड तालुका विकास मंडळ F-1428 मुंबई संचलित
पणदेरी पेवे पंचक्रोशी हायस्कूल च्या एस.एस.सी.2016 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपताना शाळेला 26 नोव्हेंबर 2024 रोजी 5 फॅन , 6 ट्यूब, 5 बल्ब, 3 फॅन दांडी, उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी 50 मीटर ग्रीन कापड असे एकूण 15000/-₹ चे साहित्य भेट म्हणून दिले आहे. यावेळी 2016 च्या बॅच च्या वतीने प्रतिनिधी म्हणून कुमार निकेश बॉर्ले हे उपस्थित होते. शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री वाकचौरे सर यांच्याकडे साहित्य सुपूर्त करण्यात आले.यावेळी प्रशालेचे शिक्षक श्री इंगळे सर, लिपिक पालकर भाऊ, शिपाई हीलम भाऊ,शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.
केवळ एका wh ग्रुपवर आवाहन करून लगेच माजी विद्यार्थ्यांनी कार्यवाही करून ग्रामीण भागात सामाजिक बांधिलकी शाबूत आहे याचा आदर्श समाजात घालून दिला.
2016 च्या बॅच चे माजी विद्यार्थी कुमार शुभम काप यांनी विशेष पुढाकार घेऊन शाळेला मदत मिळवून दिली.
भविष्यात शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी अजून काम करणार असल्याचे माजी विद्यार्थी यांनी सांगितले. माजी विद्यार्थ्यांच्या कामाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
माजी विद्यार्थ्यांच्या या दातृत्वाबद्दल संस्था, शालेय समिती , शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक,विद्यार्थी यांच्यावतीने आभार मानण्यात आले.












