ओटवणे भानसेटेम्ब बागायतदार ग्रामस्थांचे वीज अभियंत्यांना निवेदन.

ओटवणे (प्रतिनिधी ) ओटवणे देऊळवाडी भानसे टेम्ब येथील ग्रामस्थानी कृषी पंपाना होणाऱ्या अनियमित वीज पुरवठ्याने त्रस्त ग्रामस्थानी वीज उपभियंता यांच्यासावंतवाडी कार्यालयात जात निवेदन देत आपल्या समस्यांचा पाढा वाचला.

 

 

ओटवणे भानसेटेम्ब येथील ग्रामस्थांची नदी किनारी बागायती, शेती मोठ्या प्रमाणात आहे. मात्र या शेती पंपाना दिला गेलेला वीज पुरावठा सरमळे येथून दिला गेला आहे. मात्र सातत्याने यात बिघाड होत असल्याने शेतकरी बागायत दरांचे मोठे नुकसान होते. आता सध्या पाऊस संपल्याने येथील शेतकरी पम्पाच्या पाण्यावरच अवलंभून आहेत अशा अवस्थेत जर वारंवार वीज पुरवठा बंद होत असेल तर शेती बागायती करायची कशी असा सवाल विचारला जात आहे.या भागात पंपाना जी वीज जोडणी आहे ती सरमळे येथून असून झाडी झूडपे आणि नदीच्या वरून येत असल्याने सातत्याने त्रास सहन करावा लागतो यामुळे या भागातील शेतकऱ्यांना ओटवणेतूनच वीज जोडणी द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे येथील ग्रामस्थ शेतकरी यांनी केली आहे. यावेळी सहाय्यक वीज अभियंता सुशांत शिवणे यांनी ग्रामस्थाना शब्द दिला असून लवकरच सर्वे करून नवीन वीज वाहिनी टाकण्यासाठी चा प्रस्ताव जिल्हा नियोजन तसेच वीज वितरण कंपनी पाठवणार असल्याचे सांगितले.यावेळी नारायण भानसे,दाजी भानसे, मोहन भानसे,आबा भानसे, संतोष भानसे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.