मसूरे | झुंजार पेडणेकर : देवगड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री भगवती हायस्कूल मुणगे या प्रशालेने यश प्राप्त केले आहे.विध्यार्थी प्रतिकृती उच्च प्राथमिक विभाग द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
दक्षेश गुरूप्रसाद मांजरेकर, वेदांत सचिन तवटे यांनी प्लास्टिक वेस्ट कलेक्शन इंडिकेटर बनवला होता.
प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये सलोनी विजय परब, दक्षेश गुरूप्रसाद मांजरेकर यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
शिक्षक प्रतिकृती माध्यमिक विभागातून प्रशालेचे तंत्रस्नेही विज्ञान शिक्षक प्रसाद नंदकुमार बागवे यांच्या ‘किरण प्रकाशाचा उजेड विज्ञानाचा’ या प्रतिकृतीने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. जिल्हास्तरीय स्पर्धे साठी सर्व प्रतिकृती पात्र ठरल्या आहेत. यशस्वी विध्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्था व प्रशालेच्या वतीने अभिनंदन होत आहे.












