रत्नागिरी ः प्रतिनिधी
शहरातील भाट्ये बिच आणि मिरजोळे येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणार्या तिघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार 7 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 ते 7 वा. कालावधीत करण्यात आली आहे.
रोहन अप्पासाहेब पाटील (28, रा. करवीर, कोल्हापूर), अमोल मोहन शेलार (36, रा. करवीर, कोल्हापूर) आणि करण राजरत्न जाधव (29, रा.मुळ रा. संगमेश्वर सध्या रा. शांतीनगर, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 कलम 84 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












