गोठणे दोनिवडे ग्रामविकास मंडळ मुंबई चे कार्य कौतुकास्पद: आमदार किरण सामंत

 

गोठणे दोनीवडे ग्रामविकास मंडळ मुंबई चा १६ वा वर्धापन दिन साजरा

राजापूर (वार्ताहर): गोठणे दोनिवडे ग्रामविकास मंडळ मुंबई गावातील विविध क्षेत्रांमध्ये गेली १६ वर्ष कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून वेगवेगळी कामे आज ग्रामीण ठिकाणी केली जात आहेत त्याचा अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असून आपल्या मंडळाचे कार्य हे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी केले.

शैक्षणिक, आरोग्य, कला-क्रीडा, सामाजिक, सहकार, कृषी, पर्यावरण व धार्मिक अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या गोठणे दोनीवडे ग्रामविकास मंडळ मुंबई (रजि.) या मंडळाचा १६ वा वर्धापन दिन नुकताच श्री छत्रपती शिवाजी मंदिर, दादर, मुंबई येथे मंडळाचे अध्यक्ष मनोहर नाचणेकर यांच्या अध्यक्षतेखाली आमदार श्री. सामंत यांच्या प्रमुख उपस्थीत पार पडला. यावेळी गोठणे दोनिवडे ग्रामविकास मंडळ मुंबईच्या वतीने आमदार सामंत यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना श्री. सामंत बोलत होते.

ते पुढे बोलताना म्हणाले की, विधानसभेचा आमदार म्हणून शपथ घेतली आणि शपथ घेतल्यानंतर पहिलाच सत्काराचा कार्यक्रम गोठणे दोनिवडे ग्रामविकास मंडळ मुंबई च्या माध्यमातून झाला आहे. त्याबद्दल मी कोकण वासियांसाठी सेवा करत असल्याचा मला अभिमान आहे. भविष्यकाळामध्ये राजापूर लांजा साखरपा वासियांनी मतदानातून दिलेले माझ्यावरील भरभरून प्रेम ही त्यांची आयुष्यात सेवा करून पूर्ण करेन असा शब्दही आमदार किरण सामंत यांनी या कार्यक्रमातून दिला. तर येणारा काळामध्ये गोठणे दोनिवडे ग्रामविकास मंडळा सोबत मी भक्कमपणे उभा असून ज्या ज्या वेळेस माझी मदत लागेल त्यावेळेस हाक मारा मी तुमच्या पाठीशी असल्याचा विश्वास यावेळी आमदार सामंत यांनी दिला.

यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नमन लोककला संस्था (भारत) अध्यक्ष रवींद्र मटकर, अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघ सरचिटणीस संतोष जोगले, पंचक्रोशी ग्रामविकास समिती राजापूर मुंबई अध्यक्ष अनिल भोवड, कुणबी सहकारी बँक संचालकसंतोष चौगुले, श्रमसफल्य सहकारी पतसंस्था मुंबई अध्यक्ष राजाराम राघव उपस्थीत होते. त्यांचा मंडळाच्या वतीने हृदय सत्कार करण्यात आला.

तसेच यावेळी भास्कर चव्हाण, मारुती नेमण, राजेंद्र धुमक साहेब, गोठणे दोनिवडे गावचे गावकर सुभाष नाचणेकर, मंडळाचे उपाध्यक्ष सुनिल राघव, सुरेश मेस्त्री, विजय हातणकर, संतोष हातणकर, सहसचिव प्रकाश दळवी, संदीप नाचणेकर, रुपेश हातणकर, मनोज नाचणेकर, श्री प्रकाश जड्यार, यशवंत जड्यार, महिला अध्यक्षा सौ. जान्हवी राघव, सौ. सुचित्रा मेस्त्री, सहसचिव सौ. पुनम राघव, शिक्षक समिती अध्यक्ष शिवराम राघव, युवक अध्यक्ष अविनाश राघव, महेंद्र नाचणेकर, उमेश हातणकर, मंगेश तरळ, मनोहर राघव, दिलीप दळवी, डॉ. अनिल राघव, संतोष गोठणकर, महेश राघव, मंगेश दर्पे, संतोष राघव, शिवराज भोसले, महेश मांडवे, नितीन हातणकर, प्रकाश नाचणेकर, रमेश नाचणेकर, संतोष लोळगे, खलील मापारी, विलास राघव, रुपेश शिवगण, रोहित नाचणेकर, सुभाष चिपटे आदी उपस्थीत होते.

कार्यक्रमांचे सुत्रसंचालन आणि संयोजन मंडळाचे सरचिटणीस, गोठणे दोनिवडे गावप्रमुख विश्वास शंकर राघव यांनी केले.

.