वेगुर्ला l प्रतिनिधी :खानोलीत पौराणिक नाट्य महोत्सवाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे , मालगुंड या नामांकित शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनिल उर्फ बंधू साहेब मयेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आपल्या मनोगतात कोकणच्या समृद्ध लोकपरंपरेचा मानबिंदू असलेल्या दशावतार नाट्यकलेचा गौरव करत दशावतार हे कोकणचे वैभव असल्याचे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.
दशावतार ही कोकणची खरी ओळख असून, या कलेच्या जतनासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. “दशावतार ही केवळ नाट्यकला नसून ती आपल्या संस्कृतीचे प्रतिबिंब आहे,” असे ते म्हणाले.
महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात विविध बुवा भालचंद्र केळुसकर, बाळू देसाई, शासकीय लेखापरीक्षक धर्णे शरद चव्हाण , सदानंद मेस्त्री, सिध्देश्वर प्रभु , संतोष सनगरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी दशावतारातील पारंपरिक वेशभूषा, रंगभूषा आणि सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
खानोलीतील हा नाट्य महोत्सव आठवडाभर चालणार असुन विविध पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग सादर केले जाणार आहेत, या महोत्सवात स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.
या महोत्सवामुळे लोककलेला नवे व्यासपीठ आयोजकांनी सांगितले.
या भव्य उद्घाटन सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात सांस्कृतिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, रसिक प्रेक्षकांकडून महोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेल्या सुनिल मयेकर यांचा खानोली ग्रामस्थांच्या वतीने शाल श्रीफळ बुके आणि मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा वैभव खानोलकर यांनी केले











