ग्रामपंचायत पाटपन्हाळे मार्फत पाटपन्हाळे नं.१ शाळेमधील विद्यार्थ्यांना क्रिडा ड्रेसचे वाटप 

 

शृंगारतळी (वार्ताहर ) पालपेणे येथे तालुकास्तरिय क्रीडा स्पर्धा संपन्न होणार असून त्या अनुषंगाने शाळेतील विद्यार्थी खेळण्यासाठी जाणार आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी ग्रामपंचायत पाटपन्हाळेकडे क्रीडा ड्रेसची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार ग्रामपंचायत पाटपन्हाळेच्या १५ व्या वित्त आयोगातून विद्यार्थ्यांना क्रीडा ड्रेस घेण्यात आले.

विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामपंचायत पाटपन्हाळेच्या वतीने पाटपन्हाळे नं.१ शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना क्रीडा ड्रेसचे वाटप करण्यात आले. यावेळी पाटपन्हाळे ग्रामपंचायतचे सरपंच विजय तेलगडे, उपसरपंच आसीम साल्हे, सदस्या चैताली कदम, दिनेश चव्हाण, केंद्रप्रमुख लोहकरे सर, मुख्याध्यापक जावरे सर, इतर सर्व शिक्षक, व विद्यार्थी उपस्थित होते.