दोडामार्ग | सुहास देसाई :पिकुळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ, मुंबई आणि श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय, पिकुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सुवर्ण महोत्सव सांगता समारोह’ येत्या शुक्रवार, १ मे २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. १९७३ साली स्थापन झालेल्या या विद्यालयाच्या देदीप्यमान प्रवासाचा गौरव या सोहळ्याच्या निमित्ताने केला जाणार आहे.
दोडामार्ग येथील पत्रकार परिषदेत मंडळाचे सचिव प्रमोद गवस यांनी या कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. यावेळी अनंत धुरी, सुनील गवस, अशोक गवस, सुभाष गवस, विद्याधर धुरी आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमात भक्ती, शक्ती आणि संस्कृतीचा संगम असणार असून महाराष्ट्र दिनी
विद्यालयाच्या पटांगणात होणारा हा सोहळा सकाळी १०:३० वाजल्यापासून सुरू होईल.
सकाळी १०:३० – १०:४५: मान्यवरांचे स्वागत आणि दीपप्रज्वलन होणार आहे
सकाळी ११:००: नूतनीकरण केलेल्या वर्गखोल्यांचे उद्घाटन व विशेष सत्कार सोहळा.
दुपारी: मान्यवरांची मनोगते आणि महिलांसाठी खास ‘खेळ पैठणीचा’.
संध्याकाळी ५:००: प्रसिद्ध सिनेकलाकार किशोर सावंत यांचा मिमिक्री व जादूचे प्रयोग.
संध्याकाळी ६:३०: विजयानंद नाईक यांचे सुश्राव्य शास्त्रीय गायन.
रात्री ८:००: ‘देवी विशालाक्षी महिमा’ – भव्य पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग.आदी कार्यक्रम होणार आहे यामध्ये विशेष ‘गवस’ बंधू-भगिनींचा होणार विशेष गौरव
या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गवस कुटुंबातील रत्नांचा सत्कार!
प्रदीप उत्तम गवस (नगरसेवक, नवी मुंबई मनपा)
भाजपा दोडामार्ग तालुका अध्यक्ष दीपक गवस (जिल्हा परिषद सदस्य)
पार्वती गवस (सभापती)शिवसेना तालुका प्रमुख श्री गणेशप्रसाद गवस (उपसभापती)
स्नेहा गवस (पंचायत समिती सदस्या) आदी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे
या सोहळ्याचे उद्घाटन नवी मुबंईचे नगरसेवक प्रदीप उत्तम गवस यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी सिडकोचे सल्लागार मोहन गुणाजी गवस असतील. प्रमुख पाहुणे म्हणून आरटीओ अधिकारी विजय काळे, युवा नेते विशाल परब, संपादक शेखर सामंत, संदीप देसाई, तसेच बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा कल्पनाताई तोरसकर व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
“शैक्षणिक परंपरा, सामाजिक एकात्मता आणि सांस्कृतिक वैभव यांचा त्रिवेणी संगम असलेल्या या सोहळ्याला सर्व ग्रामस्थ, माजी विद्यार्थी आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.”
असे आवाहन आयोजक समिती, पिकुळे तथा सचिव प्रमोद गवस यांनी केले आहे












