लांजा रेस्ट हाऊस या ठिकाणी पार पडला पक्षप्रवेशाचा कार्यक्रम

लांजा (प्रतिनिधी) लांजा रेस्टहाऊस या ठिकाणी आज शनिवारी झालेल्या छोटेखाली कार्यक्रमात आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा बँक संचालक महेश उर्फ मुन्ना खामकर यांच्यासह शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. आगामी न.पं.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.
लांजा रेस्ट हाऊस या ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमात काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष व लांजा तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेश तथा मुन्ना खामकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष (शरद पवार गट) शरीफ नाईक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला शहर संघटक छाया गांगण तसेच मंदार गांगण, बावा राणे, पंकज लांजेकर यांनी आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.
या सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार किरण सामंत यांनी पक्षाची शाल घालून स्वागत केले. याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख गुरूप्रसाद देसाई ,विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरूप, लांजा नगराध्यक्ष मनोहर बाईत , पदाधिकारी यशवंत वाकडे यांच्यासह अन्य प्रमुख शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते ,नगरसेवक उपस्थित होते.












