माखजन हायस्कुल चा उपक्रम
माखजन l वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल येथे दरवर्षी परसबाग फुलवली जाते.यातून मिळणारी भाजी सध्या शालेय पोषण आहारात वापरण्यात येत आहे.विद्यार्थांना सकस पोषण आहार मिळावा यासाठी या भाजीचा वापर केला जात आहे.
यामध्ये हिरवा, लाल माठ, कोथिंबीर,मुळा,मिरची,पालक,आदी भाज्यांचे वाफे तयार करण्यात आले आहेत.दररोज वेगेवगळी भाजी नियमित पोषण आहाराच्या आमटी मध्ये घातली जात आहे.पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भाजीचा वापर विक्री आधी दैनंदिन पोषण आहारात केला जात असल्याने याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
परसबागेचे व्यवस्थापन मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे तर प्रशालेतील सचिन साठे,श्रीरंग कुंभार,जगदीश जाधव,जयश्री सुतार,सौ निशा सुतार आदी विशेष मेहनत घेत आहेत.
या प्रकल्पाचे संस्था अध्यक्ष किशोर साठे, व अन्य संचालकांकडून कौतुक होत आहे











