सातार्डा पंचक्रोशी टिळक ग्रंथालयाचे आयोजन
सातार्डा l प्रतिनिधी :सातार्डा पंचक्रोशी टिळक ग्रंथालयाच्या सुवर्णं महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित वेशभूषा स्पर्धेत तीन गटांमध्ये आर्या महेंद्र वेंगुर्लेकर, शिवराम चंद्रकांत साळगावकर व हर्ष शंकर पारिपत्ये यांनी प्रथम क्रमांक पटकावले.
स्पर्धेचे उद्घाटन कवठणी सरपंच अजित कवठणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मांजरेकर, कवठणी ग्रामपंचायत सदस्या शर्मिला मांजरेकर, माजी सरपंच उदय पारिपत्ये, गजानन शिरसाट, सामाजिक कार्यकर्ते सुधा कवठणकर, माजी पं स सदस्या श्रुतिका बागकर, पोलीस पाटील विनिता मयेकर, संदीप सातार्डेकर, परीक्षक नम्रता बागकर – कळंगुटकर, बापू कवठणकर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे – मोठा गट (इयत्ता आठवी ते दहावी) प्रथम आर्या महेंद्र वेंगुर्लेकर (झाशीची राणी), द्वितीय संजना गणेश घाडी (येसूबाई), तृतीय स्नेहा गणेश टेमकर (ताराबाई), इयत्ता पाचवी ते सातवी गटामध्ये प्रथम शिवराम चंद्रकांत साळगावकर (नारद), द्वितीय चैताली दत्ताराम सातार्डेकर (जिजामाता), तृतीय हर्ष संदीप गोवेकर (शिवाजी), इयत्ता पहिली ते चौथी लहान गटामध्ये प्रथम हर्ष शंकर पारिपत्ये (भक्त प्रल्हाद), द्वितीय ऋत्वीता शिवा टेमकर (बुरगुंडा), तृतीय श्रीशा दत्ताराम कांबळी (मदर तेरेसा) यांनी बक्षिसे पटकावली. स्पर्धेत प्रदयूम्न कळंगुटकर याने उत्स्फूर्तपणे साकारलेली जय हनुमान वेषभूषा लक्षवेथी ठरली.
सातार्डा पंचक्रोशी कलेचा आगार आहे. अनेक कार्यक्रम साकारले जात आहेत. पंचक्रोशी टिळक ग्रंथालयाने अडचणीतून वाटचाल सुरूच ठेवली आहे. वाचनाने सर्वांगीण विकास होतो. बालवयातील संस्कार कायमस्वरूपी टिकतात. ग्रंथालयाच्यावतीने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम सादर केले जात आहेत, असे प्रतिपादन आरोंदा हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक अरुण धर्णे यांनी केले.
ग्रंथालयाचे कार्यकर्ते ज्ञानदीप राऊळ, बाबी मेस्त्री, नारायण बागकर, संतोष गोवेकर, आपा पारिपत्ये, महेंद्र मांजरेकर, संदेश कवठणकर, आपा शिरोडकर, पांडुरंग हळदणकर, दीपक मांजरेकर, विलास मांजरेकर, मेघश्याम बागकर, परशुराम मांजरेकर, रविंद्र कवठणकर, ग्रंथपाल संजय कवठणकर, उत्कर्षां आरोदेकर, शिक्षक, पालक यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी आनंद तानावडे, गणेश मांजरेकर, सदाशिव बागकर, यज्ञेश शिरसाट यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन धनंजय केरकर यांनी केले.










