मसूरे | झुंजार पेडणेकर : बांदिवडे येथील श्री देवी पावणाई- भगवतीचा नवीन मांडणीचा वार्षिक दुसरा गोंधळ उत्सव 24 जानेवारी रोजी संपन्न होणार आहे. यनिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वा. देवीची सजावट व पूजा अर्चा, स. १०.३० वा. दर्शन व ओटी भरणे कार्यक्रम सुरुवात, दु. १.०० वा. देवीला नैवेद्य, दुपारी १.१५ ते ३.०० वा भाविकांना महाप्रसाद,सा. ४.०० ते रात्री ८.०० पर्यंत – देवीच्या चाळ्याला भक्ष देणे व माहेर वाशीण व भाविकांची राखण देणे, रात्री ८ वा. ते ९.१५ वा मान्यवरांचे सत्कार कार्यक्रम, विध्यार्थ्यांना बक्षीस वाटप कार्यक्रम.
(इ.१०वी व १२वी प्रथम व व्दितीय क्रमांक उत्तीर्ण) शैक्षणिक वस्तू वाटप कार्यक्रम (अंगणवाडी ते इ. १०वी पर्यंत शिकणाऱ्या मुलांना ) माध्यमिक शिक्षक श्री. सोनू सुधाकर सावंत सर यांच्या कडून करण्यात येईल. तसेच 80 वर्षावरील जेष्ठ नागरिकांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. रात्री ९.३० वा. देवीचा मांड भरणे, मानकरी यांचे हस्ते विधिवत पूजा व दिवटी, गोंधळ कार्यक्रम सुरु, रात्री १०.३० वा. पासून उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसाद देण्यात येईल. भाविकांनी दर्शन तसेच महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.










