यापूर्वी केली होती डागडूजी
दोडामार्ग:सुहास देसाई
तिलारी आंतरराज्य प्रकल्पाचा डाव्या कालव्याच्या डागडूजी नंतरही पुन्हा एकदा कुडासे भोमावडी नजिक कालवा फुटला असल्याने रस्त्यावर पुर परिस्थिती सारखी अवस्था झाली होती शेती बागायातीत पाणी घुसल्याने लाखोंची हानी झाली आहे
भगदाड पडल्या ठिकाणीं मातीचा भराव टाकून असल्याने सदर भाग खचत चालला होता तात्काळ तिलारी प्रकल्पाच्या अधिकारी यांनी पाणी पुरवठा बंद केला आहे
मात्र ठेकेदाराच्या निकृष्ठ कामामुळे सदर प्रकार वारंवार घडत असल्याचे शेटकरी यांनी आरोप केले आहे











