The successful tradition of M Cricket Academy Sawantwadi continues
अकॅडमीच्या ८ खेळाडूंची इनव्हिटेशन लीगसाठी निवड
सावंतवाडी । प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनच्या १६ वर्षाखालील १५ मे पासून सुरु झालेल्या इनव्हीटेशन लीगसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या १४ जणांच्या संघामध्ये एम क्रिकेट अकॅडमी सावंतवाडीच्या ८ खेळाडूंची निवड झाली आहे. यात प्रामुख्याने साजिल खतिब, इशांत कुबडे, अथर्व तोरस्कर, रुद्रेश कर्णिक, मंथन नाईक, आर्यन दुधवडकर, पार्थ नर, साहिल नाटलेकर यांचा समावेश आहे. निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे अकॅडमीचे अध्यक्ष उदय नाईक व खजिनदार अक्रम खान यांनी अभिनंदन करून त्यांना इनविटेशन लीग साठी शुभेच्छा दिल्या. वरील सर्व खेळाडूंना प्रशिक्षक राहुल रेगे, नील रेगे व अविनाश जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे अकादमीचे अध्यक्ष उदय नाईक यांनी प्रतिभावंत खेळाडूंची निवड केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे आभार मानले. अकॅडमीचे सर्व खेळाडू उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून निश्चितच यश संपादन करतील असा विश्वासही उदय नाईक यांनी व्यक्त केला.












