Chhatrapati Sambhaji Maharaj Birth Ceremony and 9th Anniversary Celebration of Chhava Pratishthan Ratnagiri
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील नारशिंगे गावात १४ मे २०२३ रोजी छत्रपती संभाजी महाराज जन्म सोहळा व छावा प्रतिष्ठान रत्नागिरीचा ९ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला झाला. या निमित्ताने छावा प्रतिष्ठान रत्नागिरीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये छ.संभाजी महाराजांना अभिषेक व प्रतिमा पुजन, आरती, मुलांचे विविध गुणदर्शन स्पर्धा, महिलांकरीता विविध स्पर्धा, हळदी कुंकु व मान्यवरांचा सत्कार समारंभ व मनोगत असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.
हळदीकुंकु व स्पर्धेमध्ये ९८ महिलांनी सहभाग घेतला तसेच मुलांचे विविध गुणदर्शन स्पर्धेमध्ये ४० मुलांनी सहभाग घेतला. त्याचप्रमाणे तालुक्यातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला जेष्ठ उद्योजक रविंद्र उर्फ आण्णा सामंत, नेताजी पाटिल, मिलिंद खानविलकर, रोहित मयेकर, प्रतिक देसाई, महेश देसाई, अनंत कुल्ये, राहुल सोनकांबळे, चंद्रकांत देसाई, विजय कांबळे, प्रविण रोडे ई मान्यवरांची उपस्थिती लाभली. या संपुर्ण कार्यक्रमाला १३२५ शिवशंभू पाईक उपस्थित होते. या कार्यक्रमाला छावा प्रतिष्ठान रत्नागिरीचे शिलेदार सुनिल धावडे ( संस्थापक / अध्यक्ष), समीर गोताड (सचिव), संगम धावडे (खजिनदार), समीर धावडे (संघटक), संतोष आग्रे( कार्याध्यक्ष), मोहन पवार ( सल्लागार), नितिन रोडे( प्रवक्ता), सदस्य संदेश धावडे, राहुल धावडे, सचिन धावडे, प्रविण धावडे, नंदकुमार धावडे, विजय धावडे, निलेश कळबंटे, सुदिप पवार, मुकेश धावडे, प्रशांत कांबळे, चंद्रकांत गोताड, हरिश्चंद्र गोताड, प्रकाश गोताड, गणेश कांबळे, विशाल कांबळे, निलेश गावणकर यांच विशेष सहकार्य लाभले












