वेंगुर्ले l प्रतिनिधी :बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला यांच्या वतीने ग्रंथालय उपक्रमांतर्गत शिवजयंती निमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन सलग २४ व्यां वर्षी करण्यात आले आहे. ही स्पर्धा दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे.सदर स्पर्धा दोन गटांमध्ये घेतली जाणार आहे – शालेय गट (१ ली ते १० वी) आणि खुला गट.
शालेय गटासाठी: “सुभाषचंद्र बोस: भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील जाज्वल नायक” हा विषय असून सादरीकरण कालावधी किमान ६ मिनिटे तर कमाल ७ मिनटे असा असेल. खुल्या गटासाठी: “शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ऐतिहासिक महत्त्व ” असा विषय असून सादरीकरण कालावधी किमान ८ मिनिटे तर कमाल १० मिनिटे असा असेल.
पारितोषिके पुढील प्रमाणे:
शालेय गट: प्रथम पारितोषिक – ₹१०००, प्रमाणपत्र आणि चषक, द्वितीय पारितोषिक – ₹७५०, प्रमाणपत्र आणि चषक, तृतीय पारितोषिक – ₹५००, प्रमाणपत्र आणि चषक, उत्तेजनार्थ (प्रथम) – ₹ ३००, प्रमाणपत्र आणि चषक, उत्तेजनार्थ (द्वितीय) – ₹ ३००, प्रमाणपत्र आणि चषक.
खुला गट: प्रथम पारितोषिक – ₹१५००, प्रमाणपत्र आणि चषक, द्वितीय पारितोषिक – ₹११००, प्रमाणपत्र आणि चषक, तृतीय पारितोषिक – ₹ ७५०, प्रमाणपत्र आणि चषक, उत्तेजनार्थ (प्रथम) – ₹५००, प्रमाणपत्र आणि चषक, उत्तेजनार्थ (द्वितीय) – ₹५००, प्रमाणपत्र चषक. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र प्रदान केले जाईल.
स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी इच्छुक स्पर्धकांनी खालील संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा प्रा. डॉ. सचिन परुळकर ९४२१२३८०५३, प्रा. पी. एम.देसाई. ९४२३३०१२६५
या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. चौगले यांनी केले आहे.











