रत्नागिरी ः प्रतिनिधी
देवरुख (ता. संगमेश्वर) येथील तरुणाचा कोंडमाझरे रस्त्यावर दुचाकीवरिल ताबा सुटुन अपघात झाला. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची ही घटना मंगळवार 16 मे रोजी दुपारी 3 वा.सुमारास घडली आहे.
मनोज शंकर गोंधळी (20, रा. देवरुख) असे जखमी दुचाकि चालकाचे नाव आहे. मंगळवारी दुपारी मनोज आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन कोंडमाझरे रस्त्यावरुन जात असताना त्याचा दुचाकीवरील ताबा सुटून अपघात झाला. या अपघात तो जखमी झाल्याने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.











