प्रेमजीभाई आसर शाळेत रथसप्तमी मोठ्या उत्साहात साजरी

परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित प्रेमजीभाई आसर प्राथमिक शाळेत मंगळवार दि.४ फेब्रुवारी २०२५ रोजी रथसप्तमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.संगिता नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन व सूर्य प्रतिमा पूजनाने झाली.
श्रीम.नाईक मॅडम यांनी आपल्या प्रास्ताविकातून भारतीय संस्कृतीतील सण,समारंभ हे निसर्गसंवर्धक आणि पर्यावरणरपूरक कसे आहेत याबाबत मार्गदर्शन करून रथ सप्तमी साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट केला.

 

शाळेतील शिक्षिका श्रीम.नेहा पाटील यांनी आपल्या संस्कृतीतील सूर्यदेवतेचे वैज्ञानिक व अध्यात्मिक महत्त्व सांगून रथसप्तमीची माहिती सांगितली.जर आपण दररोज सूर्य नमस्कार घातले तर आपल्यामध्ये सूर्याच्या नित्योपासना,शिस्त,त्याग,
समभाव, ज्ञान, उत्तम गुरु, व्यापकता,
इ.गुणांची वाढ होते.म्हणूनच आपण सर्वांनी दररोज सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प केला पाहिजे.अशी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.
ज्येष्ठ शिक्षिका सौ.प्राची गगनग्रास यांनी सूर्याची प्रार्थना विद्यार्थ्यांकडून म्हणवून घेतली. श्रीम.मानसी पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांकडून सूर्यनमस्कार प्रात्यक्षिके करून घेतली.
इयत्ता तिसरी व चौथीतील काही निवडक विद्यार्थ्यांनी इतर विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके करून दाखवली.सर्व विद्यार्थ्यांनी छान सूर्यनमस्कार घातले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या
शिक्षिका सौ.मयुरी कोदारे यांनी केले.