त्र्यंबकराज ते प्रयागराज महाकुंभ सायकल यात्रा शुभारंभ – नाशिक सायक्लिस्ट

दर १२ वर्षांनंतर कुंभ मेळा हरीद्वार, उज्जैन, प्रयाग राज व नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे क्रमाक्रमाने सुर्याचा विशेष राशीमध्ये प्रवेश झाला असता भरत असतो. असे बारा वेळा झाल्यानंतर जो मेळा भरतो त्यास महाकुंभ मेळा म्हणतात. म्हणजे ही स्थिती १२×१२=१४४ वर्षांनी येते. म्हणूनच यावेळी प्रयाग राज येथे भरलेल्या महाकुंभ मेळाव्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे.

हेच औचित्य साधून NCF चे सहा सदस्य या मेळ्यात सहभागी होण्यासाठी सायकल प्रवासाने १८ फेब्रुवारी २०२५, मंगळवारी सकाळी सहा वाजता रामकुंड, पंचवटी येथून निघाले आहेत

त्यांच्या प्रवासास नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशन चे अध्यक्ष मा. श्री किशोर काळे यांसह डॉ. नितीन व डॉ. मनीषा रवंदळ, आर्किटेक्ट सौ. अदिती देसाई, अनिता देसाई, श्री नंदकुमार देसाई यांसह अन्य मान्यवरांनी

फ्लॅग दाखवुन सायक्लिस्टना शुभेच्छा दिल्या

*सायकल यात्री*

श्री मोहन देसाई

श्री प्रविण कोकाटे

श्री किशोर शिरसाठ

श्री मनोज गायधनी

श्री रविंद्र दुसाने

श्री चंद्रकांत नाईक

त्यांचा हा प्रवास साधारणपणे १३०० कि.मी. राहणार असून नाशिक, निफाड, येवला, वैजापूर, छ. संभाजी नगर, जालना, मेहकर, कारंजा, वर्धा, नागपूर हा महाराष्ट्रातून होईल. पुढे सिवनी, जबलपूर, कटनी, रीवा हा मध्य प्रदेशातून आणि नंतर उत्तर प्रदेशात प्रयाग राज येथे संपन्न होईल.

त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त अमृत कुंडातील जलाने भरलेला कलश सोबत घेऊन तो त्रिवेणी संगम तीर्थात अर्पण करणार आहोत. जेणेकरून उत्तर व दक्षिण गंगेचा अपूर्व संगम त्याठिकाणी घडणार आहे. तसेच तेथून आणलेल्या कलशाने कुशावर्तात अमृतसिंचन करण्याचे प्रयोजन आहे.

मार्गात “जल ही जीवन है; शुध्द जल, पवित्र जल; नदिया हमारी माता है, कैसा पवित्र नाता है” सारख्या घोषवाक्यांनी जनजागृती करणार आहोत. तसेच सर्वसामान्यांना व विशेष करुन प्रयाग राज येथील आखाड्यात जाऊन त्यांना आपल्या येथील २०२७ च्या कुंभमेळ्यात येऊन दर्शन देण्याचे आम़ंत्रण देणार आहोत.

योग गुरु श्री नंदकुमार देसाई यांनी प्रयाग राज कुंभ साठी लाडुंचा प्रसाद पाठविला आहे