शृंगारतळी येथील श्री नीळकंठेश्वर मंदिरात दि.२५ ते २७ फेब्रुवारी पर्यंत महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन

मोडकाआगर | वार्ताहर : गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील श्री नीळकंठेश्वर मंदिरात दि.२५ ते २७ फेब्रुवारी पर्यंत महाशिवरात्री उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार दि. २५ फेब्रुवारी रोजी
सकाळी ८ वा.श्रीं ची शोडषोपचार पूजा,सकाळी ९ ते ३ वा.श्री शिवलीलामृत ग्रंथ सामुदायिक पारायण,सायं. ४ ते ५.३० वा.
प.पू. कलावती आईचे भजन,
सायं. ६ वा.हरिपाठ,रात्रौ ७ ते ९
कीर्तन – ह.भ.प. सचिन महाराज साळवी, पेवे खरेकोंड ,रात्रौ ९ नंतर महाप्रसाद,बुधवार दि. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वा.श्रीं ची शोडषोपचार पूजा,सकाळी ९ ते १२ वा.लघुरुद्र अभिषेक,दुपारी १२ वा.
महाआरती व प्रसाद,सायं. ४ वा.
प.पू. कलावती आईचे भजन,
सायं.५.३० वा.दिंडी सोहळा वारकरी सांप्रदाय,(श्री व्याडेश्वर दिंडी सेवा मंडळ ता. गुहागर),सायं. ६.३० वा.हरिपाठ – श्री व्याडेश्वर दिंडी सोहळा,रात्रौ ८ वा.कीर्तन – ह.भ.प. प्रज्ञा धामणस्कर, ताम्हणकर ,रात्रौ ११ नंतर श्रीं ची पालखी मिरवणूक
रात्रौ १२ नंतर ॐ नमः शिवाय नामजप होईल व प्रसाद वाटप
गुरुवार दि. २७ फेब्रुवारी रोजी
सकाळी ८ वा.श्रीं ची शोडषोपचार पूजा,सकाळी ९ ते १२ वा. श्री सत्यनाराणाची महापूजा,सकाळी १२ वा. आरती,दुपारी १ नंतर महाप्रसाद,सायं. ४ वा.
प.पू. कलावती आईचे भजन,सायं. ६.३० वा.हरिपाठ ,सायं. ७.३० ते ९.३० वा. कीर्तन – ह.भ.प.कु. मुक्ताताई नारायण पवार (अनारी चिपळूण),रात्रौ ९.३० नंतर
उत्सवाची सांगता, पसायदान व प्रसाद तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री नीलकंठेश्वर देवस्थान संस्था शृंगारतळी यांनी केले आहे.