मुंबई गोवा महामार्गावर ओसरगाव येथे महिलेचा मृतदेह जळताना आढळला 

घातपाताची शक्यता, महिला कोण याचा शोध सुरू 

बाहेरून मृतदेह आणून जाळला असल्याची चर्चा 

अर्धे पाय,पायात पैजन असे न जळलेले शिल्लक राहिले अवयव

संतोष राऊळ (कणकवली)मुंबई गोवामहामार्गावर ओसरगाव येथे एका महिलेचा जळालेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला आहे. सोमवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली. दरम्यान हा घातपाताचा प्रकार असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच मृतदेह बाहेरून आणून येथे जाळण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ओसरगाव येथे एमव्हिडी कॉलेज पासून काही अंतरावर महामार्गापासून सुमारे 100 मीटरवर एकाच ठिकाणी आग दिसून आली. सामाजिक कार्यकर्ते बबली राणे यांनी याबाबत पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता बहुतांशी मृतदेह जळालेला होता.

सदर गुन्ह्यातील मृत महिलेचे वर्णन खालील प्रमाणे आहे.

1. एका महिलेचे जळालेले प्रेत, त्याचा उजवा पाय गुडघ्यापासून शिल्लक आहे. त्या पायामध्ये चांदीच्या धातू सारखी पैजन आहे. डावा पायाचा तळवा अर्धवट शिल्लक आहे.

2. हातात हिरव्या बांगड्या व पिवळ्या धातूच्या बांगड्या जळालेल्या स्थितीत आहेत.

3. साधारण 6 किंवा 7 नंबर ची लेडीज चप्पल असून चपलाच्या खालील बाजूस (फूटप्रिंट) फुलाची डिझाईन आहे.

4. महिलेची ऊंची अंदाजे 5 फूट आहे.

5. गळ्यामध्ये मंगळसूत्र किंवा धातूची /काळ्या मणांची माळ जळालेल्या स्थितीत दिसत आहे.

6. कानात पिवळ्या धातूची कर्णफुले जळालेल्या स्थितीत आहेत.

वरील महिलेबाबत काही उपयुक्त माहिती मिळून आल्यास कृपया खालील नमूद क्रमांकावर संपर्क करण्यास विनंती आहे. *माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

पोलीस निरीक्षक *श्री.राजेंद्र पाटील*

*8275303681*

पोलीस निरीक्षक *श्री मारुती जगताप*

*8329483018*

पोलीस उपनिरीक्षक *श्री. समीर भोसले*

*8425887880*

पोलीस उप निरीक्षक श्री. रामचंद्र शेळके

*9422584888*

पोलीस हवालदार श्री. प्रमोद काळसेकर

*8605724105*

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग

असे आवाहन करण्यात आले आहे.