गावखडी/वार्ताहर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेर्वी गुरववाडी शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमा निमित्त महिलांचे हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला. त्या निमित्ताने माता पालक संघाच्या विविध स्पर्धा चमचा गोटी, गोंता उडी, फुगा टिकवणे, मुलीला टिकली लावणे या स्पर्धा घेण्यात आल्या.
श्री देवी नवलाई मंदिरात विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्यानिमित्ताने माजी 10 वी उत्तीर्ण विद्यार्थी कु अर्णव दिपक गुरव 86% व सुयश संतोष खर्डे ८१% उत्तीर्ण विद्यार्थी यांचा भेट देऊन सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थी ८वी NMMS शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी कू. साहस सुहास गुरव, कु. दिव्या प्रभाकर गुरव, व कु. नीरजा निलेश गुरव या विद्यार्थ्यांचाही भेट देऊन सत्कार करण्यात आला. सन २०२३/२४ मंथन स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी कु. गंधार सत्यवान पेटकर १ ली केंद्रात द्वितीय, कैवल्य ओंकार अभ्यंकर १ ली केंद्रात तृतीय, विहान निलेश म्हाद्ये उत्तम गुणांनी उत्तीर्ण, भूमिका प्रविण नागवेकर २ री, निनाद मनोज खर्डे २ री उत्तम गुणांनी उत्तीर्ण, यश विनायक पावसकर ३री केंद्रात ४ था, गार्गी निलेश म्हादये उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भेट देऊन सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री सतोष सदानंद मुडे, शिक्षण सेवक मसरत शेख सर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. दिप्ती शैलेश पावसकर , शाळेचे संस्थापक दिलीपशेट गुरव, तंटा मुक्ती समिती अध्यक्ष श्री रूपेश कुरतडकर, पोलिस पाटील शैलेश कुरतडकर, अंगणवाडी सेविका सौ. सत्यश्री खर्डे मॅडम, शिक्षक पालक संघ सदस्य निलेश म्हाड्ये, गोपीनाथ गुरव, प्रविण नागवेकर, नरेंद्र खर्डे, संदिप गोठणकर, विनायक पावसकर, योगेश पावसकर, वैभव चव्हlण यांच्या शुभ हस्ते सर्व मुलांचा सत्कार करण्यात आला. व या कार्यक्रमाला सर्व पालक ग्रामस्थ उपस्थित होते.
तसेच अध्यक्षीय भाषणात श्री दिलीप गुरव यांनी विद्यार्थांना विविध कलागुण प्रोत्साहन देणे गरजे आहे
एखादा विद्यार्थी चांगला घडवून समाज परिवर्तन करणे गरजे आहे











