गावखडी / वार्ताहर : रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेत मराठी राजभाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांच्या 113 व्या जयंतीचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या प्रारंभीस पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सहभागाने लेझीम च्या ठेक्यात ग्रंथदिंडी काढण्यात आली. ” मराठी भाषा आहे सक्षम , करूया संस्कृतीचे रक्षण ” ” “मराठी भाषा आहे गोड , वाढवी शिक्षणाची ओढ ” अशी घोषवाक्ये देत जि.प.मेर्वी शाळेच्या वतीने प्रभात फेरी काढण्यात आली.
याप्रसंगी जि.प.पूर्ण प्राथमिक मराठी शाळा मेर्वी शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ.संजया पावसकर, उपशिक्षक श्री.चंद्रशेखर पेटकर, शिक्षिका सौ. श्रेया रसाळ ,अंगणवाडी मदतनीस श्रीम. आकांक्षा गुरव, आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली होती. त्यानंतर मराठी राजभाषा दिनानिमित्त जि.प. मेर्वी शाळेत विद्यार्थ्याची निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमात उपशिक्षक श्री.चंद्रशेखर पेटकर यांनी महाराष्ट्राची मातृभाषा मराठी हि समृद्ध असून तिचे जतन व संवर्धन करणे हि आजच्या पिढीची जबाबदारी आहे.असे प्रतिपादन केले.तसेच वि.वा.शिरवाडकर यांच्या साहित्याविषयी माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.तसेच या कार्यक्रमात मुख्याध्यापिका सौ.शर्वरी करगुटकर यांनी आपल्या मनोगतातून सर्वांनाच मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
शेवटी शिक्षिका सौ. श्रेया रसाळ यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली.










