मनसे गुहागरच्या वतीने महावितरण गुहागर यांना निवेदन
मोडकाआगर l वार्ताहर : गुहागर तालुक्यात भूमिगत विद्युत वाहिनीचे काम करत असताना रस्त्याच्या कडेने खोदकाम सुरू असल्याने त्यामुळे रस्त्याच्या कडेलगतच्या साईट पट्ट्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे,
परिणामी रस्त्याचा पृष्ठभाग नादुरुस्त होऊन रस्त्यावर खड्डे पडत आहेत. संबंधित ठेकेदाराकडून रस्त्याचे होणाऱ्या बाबत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी कार्यकारी अभियंता,विभाग चिपळूण,महावितरण कंपनी यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे. सदर दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, गुहागर तालुक्यातील समुद्रालगत असलेल्या गावांमध्ये भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याच्या सुरु आहे.त्यासाठी रस्त्याच्या कडेने खोदकाम सुरू असल्याने त्यामुळे रस्त्याच्या कडेलगतच्या साईट पट्ट्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे
परिणामी रस्त्याचा पृष्ठभाग नादुरुस्त होऊन रस्त्यावर खड्डे पडत आहेत गटारात टाकलेल्या भूमिगत विद्युत वाहिन्यामुळे भविष्यात दुर्घटना घडू शकते, केबल दुर्घटनेमध्ये सतीश घाणेकर या तरुणाचा काही वर्षापूर्वी दुर्दैवी मृत्यू झाला होता .एखाद्या व्यक्तीची गंभीर घटना घडल्यावर प्रशासन लक्ष देईल का…? महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या समोरच चुकीच्या पद्धतीने काम होत असताना हे अधिकारी व त्यांचे कर्मचारी संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचे निदर्शनात येत आहे.
रस्त्याच्या बाजूला खोदाई करून भूमिगत वाहिन्या टाकण्याच्या कामात ठेकेदाराकडून सुरक्षतेचे कोणतेही मार्गदर्शक तत्वे पाळली जात नाही. संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व म.रा.वि.विकंपणी हातात हात घालून रस्त्यांची दुर्दशा करत असल्याचे दिसत आहेत.. यांना याबद्दल विचारणा केली असता आमच्या देखरेखीखाली काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु रस्त्याच्या झालेल्या दुरावस्तेबाबत ते बोलत फक्त आम्ही संबंधित ठेकेदाराला नोटीस दिल्याचे सांगत आहेत. भूमिगत विद्युत वाहिन्यां या रस्त्यालगत असलेल्या गटारामधूनच टाकण्यात आली आहे.
ती भविष्यात लाईनचे काम निघाल्यास गटाराचे नुकसान होऊ शकते तथा गटाराचे काम करताना अपघात घडू शकतो त्याला नेमके जबाबदार कोण असणार असेही प्रश्न विनोद जानवळकर यांनी विचारला आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्य कार्यकारी अभियंता म.श.वि.वि. कंपनी, रत्नागिरी यांना देण्यात आले आहे












