मंडणगड l प्रतिनिधी : लाटवण येथील,’ लाटवण पंचक्रोशी मराठी माध्यमिक विद्यामंदिर लाटवण ‘ या हायस्कूलचे हेच सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. 1975 सालात लाटवण पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या पुढाकाराने व मंडणगड तालुका विकास मंडळ, यांच्या प्रयत्नाने हायस्कूलचे आठवी ते दहावी असे वर्ग सुरू करण्यात आले होते. यावर्षी हायस्कूल पन्नासाव्या वर्षात पदार्पण करत आहे. याचे औचित्य साधून हायस्कूलचे सर्व माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी एकत्र येत ,त्यांनी आपल्या गुरुकुलाचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे.
हा महोत्सव विविध कार्यक्रमाने स्मरणीय ठरणार आहे .दोन दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यासाठी पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी सहभाग घेऊन, या माजी विद्यार्थ्यांना उपकृत करावे, तसेच आरोग्य शिबीर व मार्गदर्शनाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन सचिव मनोज चव्हाण यांनी केले आहे.
१) शनिवार दिनांक 22 मार्च 2025 रोजी उद्घाटन, माजी विद्यार्थी क्रिकेट सामने, त्यानंतर *मुलांसाठी आरोग्य शिबिर* स्नेहभोजन आणि सायंकाळी माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन व हितगुज असा कार्यक्रम असणार आहे .
२) तर रविवार दिनांक 23 मार्च 2025 रोजी सकाळी *मॅरेथॉन* स्पर्धा, त्यानंतर करिअर मार्गदर्शन यासाठी प्रख्यात शिवव्याख्याते श्री. प्रशांत देशमुख उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर स्नेहभोजन, दुपारी गुरुजनांचा सन्मान आणि हायस्कूलच्या वाटचालीसंबंधी चित्रफित दाखवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी मान्यवरांचे स्वागत आणि *मराठी बाणा* हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
यासाठी अध्यक्ष श्री. अविनाश सोंडकर तसेच सचिव श्री. मनोज चव्हाण आणि सर्व सभासद बंधू भगिनी खूप मेहनत घेत आहेत.
पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी ,मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. अशी नम्र विनंती करण्यात येत आहे.










