डॉ. कमल सेन यांच्याकडून शिरगाव हायस्कूलसाठी दोन लॅपटॉप भेट

शिरगाव, (प्रतिनिधी) : आजच्या डिजिटल शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची अधिक चांगली सुविधा मिळावी, या उद्देशाने डॉ. कमल सेन (CEO, कोजिटाज, मुंबई) यांनी देवगड तालुक्यातील शिरगाव हायस्कूलसाठी दोन लॅपटॉप प्रदान केले.

 

डॉ. सेन यांचे सहकारी श्री. मधुकर बागवे यांनी आज हे लॅपटॉप शाळा समितीचे चेअरमन श्री. विजयकुमार कदम आणि शाळेचे मानद अधीक्षक श्री. संदीप साटम यांच्याकडे सुपूर्त केले.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस. एन. आत्तार, कला शिक्षक श्री. विनोद चौगुले, वरिष्ठ लिपिक श्री. सुरेंद्र लांबोरे व कनिष्ठ लिपिक श्री. प्रकाश पवार उपस्थित होते.
डॉ. कमल सेन यांनी दिलेल्या या देणगीबद्दल शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई आणि शिरगाव हायस्कूल यांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. तसेच, डॉ. सेन यांच्या वतीने श्री. बागवे यांनी डिसेंबर २०२५ मध्ये अजून एक लॅपटॉप शाळेस देणगी म्हणून देण्यात येईल, अशी घोषणा केली.