नाचणे येथे पोलिसानी पकडले 77 हजाराचे ब्राउन हेरॉईन; एकाला ठोकल्या बेड्या 

रत्नागिरी ः प्रतिनिधी :शहरानजीकच्या नाचणे ते गुरुमळी जाणार्‍या रस्त्यावर ब्राउन हेरॉईन हा अमली पदार्थ विक्रीसाठी बाळणार्‍याला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून 77 हजारांचा अमली पदार्थ आणि दुचाकी असा एकूण 2 लाख 5 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सोमवार 7 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वा. सुमारस करण्यात आली.

अदनान नाजिममियाँ नाखवा (25,रा.जुना फणसोप,रत्नागिरी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड काँस्टेबल शांताराम झोरे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, सोमवारी सायंकाळी संशयित हा नाचणे ते गुरुमळी जाणार्‍या रस्त्यावर आडोशाला आपल्यात ताब्यात ब्राउन हेरॉईन या अमली पदार्थाच्या 154 पुड्या विक्रीसाठी बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात एन.डी.पी.एस अ‍ॅक्ट कलम 8 (क),21(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पवन कांबळे करत आहेत.