मंगेश चव्हाण मित्र मंडळाचे आयोजन
स्वप्निल कदम l कुडाळ : तालुक्यातील पिंगुळी येथील मंगेश चव्हाण मित्र मंडळ यांच्या वतीने खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 10 रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. एस.एस. पी. एम. लाईफ टाइम हॉस्पीटल पडवे यांच्या माध्यमातून हे शिबीर संपन्न होणार आहे. हृदयरोग, अस्थिरोग, दंतचिकित्सा, यूरोलॉजी, गॅस्ट्रोएंट्रोलॉजी, नेत्र तपासणे, जनरल सर्जरी, कर्करोग, प्रसूती शास्त्र व स्त्री रोग तपासणी, ई. सि.जी, बी.एस.एल नेत्र तपासणी आदी तपासण्या होणार आहेत. हे आरोग्य शिबिर पिंगुळी म्हापसेकर तिठा, बालोद्यान हॉल येथे होणार आहे.तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन पिंगुळी ग्रामपंचायत सदस्य मंगेश चव्हाण यांनी केले आहे.











