ज्यांचे हात तुमच्या दिशेने दगड भिरकावतील त्यांचा हिशोब होईल
ना. नितेश राणे यांनी दापोली वासियाना दिला विश्वास
दापोली | प्रतिनिधी
आज आजूबाजूची परिस्थिती बदलते आहे त्यामुळे तुम्ही हिंदू म्हणून एकत्र उभे रहा भक्कमपणे उभे रहा तुमच्यामुळेच आज राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे ज्यांचे हात तुमच्या दिशेने दगड भिरकावतील त्यांचा हिशोब चुकता करण्यासाठी आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे आहोत आणि हाच विश्वास देण्यासाठी आज मी इथे दापोलीला आलो आहे अशा स्पष्ट शब्दात राजेचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दापोलीतील धर्म सभेमध्ये उपस्थित हिंदू बांधवांना विश्वास दिला.

अडखळ बंदरात काही दिवसांपूर्वी पार्किंग वरून झालेल्या मारहाणीत हिंदू तरुणांना मारहाण झाली. ही जागा बंदराची असताना तिथे अनधिकृत पार्किंग होत होते. सगळ्याची दखल राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी घेतली आणि या तरुणांची भेट घेतली. यानंतर झालेल्या धर्मसभेत बोलताना ना. राणे म्हणाले तुम्ही कुणीही घाबर्याचे कारण नाही, या सगळ्याचा हिशोब करायला मी इथे आलो आहे. सुरुवात त्यांनी केली आहे, या सगळ्याचा हिशोब होणार आहे. आमच्या लोकांची डोकी फोडली आहेत त्यामुळे हिशोब बरोबरीचा झाला पाहिजे. इथल्या हिंदू समाजाने लक्षात ठेवायचे आता काळजीचे दिवस गेले आहेत आता डोकी फोडण्याचे दिवस गेलेत आता आपण सत्तेत आहोत, हे हिंदुत्ववादी विचारांचा सरकार आहे, आमच्यासारखे भगवाधारी मंत्री म्हणून तुमच्यासमोर आले आहोत, तुमच्याकडे वाकड्या नजरेने बघत असेल तर त्याला हिशोब चुकता करण्यासाठी मंत्रालयात पोहोचलो आहोत. तुम्ही काळजी करू नका खरंतर त्यांनी दगड मारण्यआधी या खात्याचा मंत्री कोण आहे बघायला हवे होते, यांनीच अनधिकृत बांधकाम करायची, नियम तोडायचा, चुकीच्या ठिकाणी डंपर लावायचे, कायदे मोडायचे आणि मग दगड आमच्यावरच मारायचे असे कसे चालेल असा सवाल विचारताना ना. नितेश राणे म्हणाले कदाचित ते विसरले असतील या गृह खात्याचे मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री एक कडवट हिंदुत्ववादी नेता आहेत, तिथे देवेंद्र फडणवीस बसले आहेत याछ त्यांना विसर पडले आहे, आठवण करून द्यायला मी आहे आणि तुम्हाला विश्वास द्यायला, ताकद द्यायला आलो आहे राज्याचा मंत्री म्हणून मी इथे आलो आहे, हे हिंदुत्ववादी सरकार तुमच्या पाठीशी भक्कपणे उभे आहे असेही ना. राणे म्हणाले.

ना. राणे म्हणाले यापुढे कुठलाही दगड तुमच्या दिशेने आला तर त्या प्रत्येक दगडाचा हिशोब होईल याचा विश्वास मी तुम्हाला देतो आहे.आज आज हिंदुत्ववादी विचारांचा सरकार आहे, त्यामुळे संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनीही कुणाला वाचवायचा प्रयत्न करू नये नाहीतर थेट फडणवीस साहेबाना उत्तर द्यावे लागेल आणि तिथे मग कोणीही वाचवायला येणार नाही असा इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. हा आमचा समुद्र किनारा सुरक्षित ठेवण्यासाठी या खात्याचा मंत्री म्हणून मंत्रालयात बसलो आहे, कोणाचीही मस्ती इथे चालू देणार नाही, वळवळ करणारे साप आहेत त्यांना कसे नीट करायचे असे सगळे औषध माझ्याकडे आहेत. मात्र हिंदू म्हणून तुम्हीएकत्र रहा, तुमच्याकडे कोणी वाकड्या नजरेने बघणार नाही हा विश्वास देतो. हिंदू म्हणून एकत्र राहण्याची गरज आहे आजूबाजूला काय चाललंय ते बघा कश्मीर येथे धर्म विचारून हिंदू पर्यटकांना गोळी घातली आहे त्यामुळे जे पाकिस्तानचे गोडवे गणारे आहेत त्यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी हिंदू समाजाने एकत्र येऊन तुम्हीही हिंदुत्ववादी संघटनांचे बांधणी पूर्ण केली पाहिजे, धर्म विचारून वस्तू खरेदी केल्या पाहिजे, ते लोक जर आपल्या धर्माबद्दल एवढ्या कडवट असतील तर आपण कशाला त्यांना श्रीमंत करतो, कसला भाईचारा आणि सर्वधर्म समभाव असा सवाल ना.राणे यांनी उपस्थित केला. तुम्ही भूमिका घ्या हिंदू समाज म्हणून एक शपथ घेऊन धर्मसभेतून निघाला पाहिजे. ज्या देशात आपण राहतो तो हिंदू राष्ट्र आहे हे आधी बोलायला शिका, या देशांमध्ये 85 टक्के हिंदू राहत असतील मग तिथे हिंदूंचचे चालणार ,बाकी कोणाचही चालणार नाही प्राधान्य हे हिंदूंना दिलं पाहिजे, हिंदू मतदान मुळेच आम्ही मंत्री झालो आहोत म्हणूनच आम्ही हिंदू समाजाचे पाठीशी उभे राहणार कसलीही चिंता करू नका, तुमची सुरक्षा करण्यासाठी नितेश राणे मंत्र म्हणून सक्षम आहे तुम्ही चिंता करू नका सगळी काळजी या समुद्रावर आपले राज्य असेल पाहिजे तीच ताकद छत्रपती शिवाजी महाराज दाखवली होती असेही ते म्हणाले. आज तुमच्या पाठीशिअम्ही आहोत ही हे तुमच्या मताची ताकद आहे तुम्ही फक्त एकजूट दाखवा मी तुमच्यासाठी इथे आलो आहे जेव्हा जेव्हा तुमच्यावर अन्याय होईल तेव्हा एक हिंदू म्हणून मी तुमच्यासाठी मी धावून येईल हा विश्वास तुम्हाला मी द्यायला आलो आहे असेही ते म्हणाले.











