भडे शाळा नं. ३ वारपट मधील विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

दिव्यांग जनकल्याण संस्था लांजाच्या वतीने आयोजन

लांजा (प्रतिनिधी) दिव्यांग जनकल्याण संस्था लांजा च्या वतीने तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा भडे नं.३ वारपट मधील नवोदय पात्र विद्यार्थी, मंथन व प्रज्ञाशोध परिक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थी यांचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला.
या कार्यक्रमाला दिव्यांग जनकल्याण संस्थेचे अध्यक्ष संजय सुर्वे त्याचप्रमाणे उपाध्यक्ष किरण धनावडे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. माने,सहाय्यक शिक्षक श्री. महाले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रीम. बंडबे, उपाध्यक्ष गजने तसेच विद्यार्थी, पालक वर्ग आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

 

या कार्यक्रमात नवोदय पात्र विद्यार्थी यामध्ये अंश मंगेश थूळ, आयुष अमित सुर्वे, अंतरा संदीप मयेकर तसेच प्रज्ञाशोध मधील प्रितल प्रसाद बंडबे, आणि मंथन परीक्षेतील अंश थूळ, अंतरा मयेकर, आयुष्य सुर्वे, प्रितल बंडगे, आस्था सुर्वे, अंतरा पाटील, विहान सुर्वे ,आध्या गजने आणि साक्षी पाटील या सर्व विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.तसेच उपाध्यक्ष किरण धनावडे यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे संच देऊन गौरव करण्यात आला. तर या निमित्ताने शाळेचे मुख्याध्यापक आणि मार्गदर्शक श्री माने यांचा देखील शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला .
यावेळी बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष किरण धनावडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करताना भविष्यात देखील अशा प्रकारे विविध परीक्षांमध्ये सुयश मिळवून आपल्या शाळेचे, पालकांचे आणि गावचे नाव रोशन करावे असे आवाहन केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. माने यांनी दिव्यांग असताना सुद्धा दुर्गम भागात येऊन शाळेतील विद्यार्थ्यांचा गौरव केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय सुर्वे ,उपाध्यक्ष किरण धनावडे यांचे विशेष आभार मानले