VENGURLE: वेंगुर्ला येथील एकदिवसीय कुकरी वर्कशॉपला वेंगुर्ला व कुडाळ तालुक्यातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Enthusiastic response from students of Vengurla and Kudal talukas to one-day cookery workshop at Vengurla

वेंगुर्ले : प्रतिनिधी : लोकमान्य एज्युकेशन, कोकण विभाग व जयहिंद कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला येथे आयोजित एकदिवसीय कुकरी वर्कशॉपला वेंगुर्ला व कुडाळ तालुक्यातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या व्यवसायात हॉटेल व्यवसायाचा अग्रक्रम लागतो. हा व्यवसाय वेगाने वाढत असल्याने या क्षेत्रात तज्ञ व्यक्तींची गरज मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे. बारावीनंतर हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रम प्रगतीच्या नव्या वाटा खुल्या करू शकतो. हॉटेल आणि पर्यटन हे दोन्ही अनुभवसिद्ध करियर आहेत. एक पर्यटक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे दहा लोकांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो. सिंधुदुर्गातच नव्हे तर भारतातील पर्यटनाच्या वाढत्या आलेखाला कुशल व प्रमाणित मनुष्यबळाची गरज लागणार आहे. या क्षेत्राची तोंड ओळख व्हावी, यासाठी लोकमान्य एज्युकेशन, कोकण विभाग व जयहिंद कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला येथे एकदिवसीय कुकरी वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते, त्याला वेंगुर्ला व कुडाळ तालुक्यातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. या वर्कशॉपमध्ये विद्यार्थ्यांना चायनीज, पिझ्झा, बर्गर, हॉटडॉग, मॉकटेल्स शिकवण्यात आले. लोकमान्य एज्युकेशनचे सिनियर एक्झिक्यूटिव्ह प्रवीण प्रभुकेळुसकर, जयहिंद कॉलेजचे प्रभारी प्राचार्य अमेय महाजन व प्राध्यापक शेफ टॅरी डेसा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हॉटेलमध्ये मिळणारे विविध पदार्थ सोप्या व कुशलतेने शिकता आले याबद्दल सर्वच विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.