RAJAPUR: राजापूर अर्बन बँकेच्या वतीने खास महिलांसाठी महिला सन्मान बचत योजना सुरू

Mahila Samman Savings Scheme launched by Rajapur Urban Bank specially for women

आजपासून बँकेच्या सर्व शाखांमध्ये योजना सुरू

राजापूर | प्रतिनिधी : राजापूर अर्बन को-ऑप. बँक लि. राजापूर च्या वतीने आता महिलांसाठी खास महिला सन्मान बचत योजना सुरू करण्यात आली आहे. 1 जून पासून ही योजना सुरू करण्यात आली असून बँकेच्या राजापूर शाखेत या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

राजापूर अर्बन बँक महिला सन्मान ठेव योजनेच्या प्रथम ठेवीदार म्हणून रोमा शेखरकुमार अहिरे यांनी आपली बहिण सेलिना शेखरकुमार अहिरे हिच्या पुढील शिक्षणाकारिता एक लाख रूपयांची ठेव योजने अंतर्गत ठेवली आहे. राजापूर शाखेत ही ठेव त्यांनी ठेवली आहे.

राजापूर अर्बन को-ऑप. बँक ही तळकोकणातील बँक आधुनिक बँकींग प्रणालीतील सर्व सेवा-सुविधा देणारी बँक म्हणून ओळखली जाते. बँकेच्या संचालक मंडळाने महिला सक्षमीकरणाकरीता त्यांच्या आर्थिक बचतीत अधिक लाभ व्हावा या हेतून बँकेच्या प्रचलित कायम ठेवीच्या व्याजदरात वाढ करण्यात आलेली असून त्या करीता स्वतंत्ररित्या ‘राजापूर अर्बन बँक महिला सम्मान ठेव योजना’ या नावाने महिलांकरीता आकर्षक व्याजाची ठेव योजना दि. ०१/०६/२०२३ पासून सूरु केली आहे. या महिला सन्मान ठेव योजनेसाठी खास व्याजदर देण्यात आला आहे. या ठेवीची मुदत ही १ वर्षापेक्षा जास्त रहाणार आहे. बॅकेच्या सर्व बाराही शाखांमध्ये ही योजना कार्यान्वयीत करण्यात आली असून या ठेव योजनेच्या अधिक माहितीसाठी महिलांनी त्वरीत बँकेच्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधावा व बँकेने महिलांसाठी सुरु केलेल्या या खास योजनेत महिलांनी आपली अधिकाधिक ठेव गुंतवून या विशेष योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन बँकेचे अध्यक्ष श्री. हनिफ मुसा काझी व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शेखरकुमार उत्तम अहिरे यांनी केले आहे.