खेड (प्रतिनिधी)लायन्स क्लब ऑफ सिटीतर्फे तालुक्यातील निराधारांना मदतीचा हात देण्यात आला. ‘निराधारांना आधार’ या उपक्रमांतर्गत शहा ऑटोमोबाईल्सचे पंकज शहा यांच्या सहकार्याने महिनाभर पुरेल इतके जीवनावश्यक साहित्यांचे वाटप करण्यात आले.
सामाजिक बांधिलकीतून मदतीचा हात देण्यासाठी लायन्स क्लब ऑफ सिटीचे पदाधिकारी अग्रस्थानी आहेत. तालुक्यातील ऐनवरे येथील कांता चंद्रकांत जाधव, कुंभारआळी येथील सुनिता रघुनाथ खेडेकर, कासारआळीतील उज्ज्वला गजानन दांडेकर या गरजू महिलांना जीवनावश्यक वस्तू वितरित करण्यात आल्या. याप्रसंगी लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे, पंकज शहा, प्रियेश शहा, महेंद्र शिरगांवकर, परेश चिखले, अविनाश दळवी, संदीप मोरे, डॉ. विक्रांत पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संजय जाधव उपस्थित होते.










