कृष्णा अँटिऑक्सिडंट प्रा.लि. कंपनी ठरली ५०० कुटुंबाची जीवन वाहिनी

३५ व्या वर्धापन यानिमित्त दिनानिमित्त रक्तदान शिबिर तसेच रोपवाटिका विभागाचे उदघाटन संपन्न

चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील गाणे खडपोली एमआयडीसीमधील कृष्णा कंपनीची स्थापना ८ मे १९९० रोजी झाली. दरम्यान रहेमान यांनी पाच कर्मचारी यांच्या सहायाने एक युनिट खडपोलीमध्ये काम करण्यास सुरुवात केली, एक रोपटे लावले असून विस्तृत काम करत आज सहा युनिट अखंडपणे कार्यरत आहेत. ज्या पाच लोकांनी सदरची कंपनी पुढे घेऊन जातं असताना आज पाचशे कामगार रोजगार निर्मिती तसेच अनेकांच्या कुटुंबाना देखील उज्वलता मिळाली, असे मुख्य व्यवस्थापक अशोक पाटील यांनी सांगितले असता कंपनीच्या माध्यमातून आज ३५व्या वर्धापन दिनानिमित्त रोपवाटिकाचा विभाग देखील सुरू करण्यात आला. जेणेकरून सभोवतालच्या शेतकऱ्यांना अति अल्पदरात लागवडीची रोप उपलब्ध होतील या रोपवाटिकेचे उद्घाटन पूर्व मुख्य व्यवस्थापक रहेमान यांच्या हस्ते करण्यात आले.

कंपनीने सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण, आरोग्यविषयक बाबींना महत्व देवून आजूबाजूच्या भागांमध्ये कामं सुरु केली. यामध्ये जिल्हापरिषद शाळा नूतनीकरण, जिल्हा परिषद शाळांमधील मुलांना इंग्रजी याविषयाची चांगले आकलन होणेसाठी कंपनीच्या माध्यमातून इंग्रजी विषय शिकवणेसाठी शिक्षकांची नियुक्ती देखील करीत असताना कंपनी इथेच थांबली नाही तर मुले शारिरीकदृष्या सक्षम होणेसाठी शाळांमध्ये मल्लखांब, संगित आकलनासाठी तबला व पेटी वादन हे उपक्रम शाळांमध्ये सुरू केले. चिपळूणच्या दृर्गम भागातील लोकांना नोकरीसाठी कंपनीने प्रथम प्राधान्य देवून सक्षम करण्याचे काम काम केले. लोकांना कंपनीच्या माध्यमातून एक जीवनवाहिनीच मिळाली. या उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याचा प्रश्न आबाजूच्या परिसरात भेडसावतो. त्यासाठी आवश्यकतेनुसार पाईपलाइन बोअरवेल उपलब्ध करून कृष्णा कंपनीने सामाजिक बांधिलकीचा हातखंडा जोपासण्याचे काम कायमस्वरूपी केले असून कंपनी सामाजिक कार्यात देखील अग्रेसर राहिलेली आहे.

यावेळी कृष्णा अँटिऑक्सिडंट प्रा.लि. कंपनीच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरा प्रसंगी तब्बल १०० रक्तदात्यांनी रक्तदान देऊन रक्तदान श्रेष्ठदान अशी सेवा केली. कार्यक्रमानिमित्त चिपळूणचे तहसिलदार प्रविण लोकरे, आलोरे-शिरगाव पोलिस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत पाटील, सहा. पोलीस पंकज खोपडे, मुख्य मार्गदर्शक रेहमानजी, कंपनीची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे मार्गदर्शक अधिकारी अशोक पाटिल, व्यवस्थापनाचे सुयोग चव्हाण तसेच कार्यालयीन अधिकारी व कामगार वर्ग उपस्थित होते.