वैभववाडी l प्रतिनिधी ; दहावी शालांत परीक्षेत भुईबावडा गावचा सुपुत्र कु. अथर्व संदीप मोरे यांने 98.60 टक्के गुण मिळवत उज्वल यश संपादन केले आहे. पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय पाचल ता. राजापूर या प्रशालेत अथर्व दहावीत शिकत होता. भुईबावडा गावच्या माजी सरपंच श्रेया मोरे यांचा अथर्व चिरंजीव. अथर्व चे वडील संदीप विठोबा मोरे हे जि.प.पुर्ण प्राथमिक आदर्श केंद्रशाळा जवळेथर या प्रशालेत उपक्रमशील शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
अथर्वला प्रशालेचे मुख्याध्यापक तानाजी देसाई, आई श्रेया मोरे, वडील संदीप मोरे तसेच शिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. घवघवीत यश संपादन केल्याबद्दल अथर्वचे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात अभिनंदन केले जात आहे.










