तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी ः प्रतिनिधी :तरुणीशी मैत्री करुन तिचा आणि तिच्या आईचा विश्वास संपादन करुन त्यांचे तब्बल 16 लाख रुपयांचे दागिने बँकेत स्वतःसाठी गहाण ठेवले. त्यनंतर वेळोवेळी संधी देउनही ते दागिने परत न करणार्या तरुणाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 28 मार्च 2025 रोजी सकाळी 10 वा. सुमारास जोळी पाळंद येथे घडली होती.
श्रवण सचिन टकेल (21,रा.तारादर्शन अपार्टमेंट,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. त्याच्या विरोधात महिलेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित श्रवण टकेलने फिर्यादींच्या मुलीशी मैत्री करुन तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर स्वतःच्य आर्थिक अडचणीचे कारण सांगून फिर्यादी महिलेचे तब्बल 16 लाख रुपयांचे दागिने त्यांच्या मुलीकडून स्विकारत ते एका बँकेत तसेच एका पतपेढीमध्ये गहाण ठेवून त्यावर कर्ज घेतले. त्यानंतर फिर्यादीने वेळोवेळी श्रवण टकेलला 8 सोन्याच्या बांगड्या,2 सोन्याचे नेकलेस, 1 बाजुबंद, 1 अंगठी, 1 जोड सोन्याचे गोठ असे गहाण टाकलेले दागिने परत करण्याची संधी दिली. परंतू त्याने ते दागिने परत न करता त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी फिर्यादी महिलेने गुरुवार 15 मे रोजी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी संशयिताविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 316(2),318(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.












