हायवेच्या कामात माती उकरली, वडाचे झाड कोसळले म्हणून सहा विद्युत पोल वाकले

ठेकेदाराचा अजब कारभार; मापारी मोहल्ला, कोंड असुर्डे, मौजे असुर्डे या ठिकाणचा भाग काळोखात

संगमेश्वर : बुधवार दिनांक 21 मे 2025 रोजी संध्याकाळी सहाच्या दरम्यान संगमेश्वर येथील पारेख पेट्रोल पंपा जवळ highway च्या कामात माती उकरल्याने वडाचे झाड कोसळले. यामुळे कसबा उच्चदाब वाहिनीचे सहा पोल वाकलेले आहेत. यात कसबा गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला आणि जनता हवालदिल झाली.

विद्युत पुरवठा का बंद झाला याचे कारण संगमेश्वर महावितरण कडून देण्यात आले, तसेच कसबा गाव हे इतर ठिकाणहून लाईट घेऊन सुरू करण्यात आलेला आहे. परंतु इतर कोणतीही व्यवस्था नसल्याने पारेख पेट्रोल पंपा जवळील भाग, मापारी मोहल्ला, कोंड असुर्डे, मौजे असुर्डे या ठिकाणचा भाग बंद राहिला आहे. सदरचे काम सकाळी सुरू होऊन दुपारी पर्यंत संपण्याची अपेक्षा आहे अशी माहितीही देण्यात आली आहे.

तसेच माती वाहून गेल्याने संगमेश्वर ITI जवळील पोल पडण्याच्या स्थितीत झाला आहे. त्यामुळे आयटीआय परिसरातील विद्युत पुरवठा बंद आहे. वरील सर्व कामे उद्या तातडीने पूर्ण करून विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.