वेंगुर्ले शहरात भर पावसात निघाली ‘ऑपरेशन सिंदूर तिरंगा रॅली’ : नागरिकांची दिसली एकजुट

वेंगुर्ले: दाजी नाईक
हिंद की सेना शान है, घुटनों पर पाकिस्तान है! ‘ऑपरेशन सिंदूर तिरंगा रॅली’ वेंगुर्ले शहरात सर्व नागरिकांनी एकजुटीने भर पावसात काढून यशस्वी केली.

पहलगाम मध्ये निष्पाप भारतीय नागरिकांची हत्या करणारे दहशतवादी आणि त्यांना पोसणारा पाकिस्तान यांना जबरदस्त तडाखा देणार्‍या भारतीय सैन्यबलांचे अभिनंदन करण्यासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वेंगुर्ले शहरात ‘ऑपरेशन सिंदूर तिरंगा रॅली’ मोठ्या उत्साहात संपन्न केली. या रॅलीत वेंगुर्ला तालुक्यातील व परिसरातील बंधूभगिनी जाती, धर्म व पक्षीय भेदाभेद विसरून एकजुटीने केवळ भारतीय म्हणून हाती तिरंगा घेऊन सहभागी झाले होते.

“भारत माता की जय, वंदे मातरम, हम सेना के साथ है, ऑपेरेशन सिंदूर के साथ है अशा घोषणा देत रॅली उत्साहात भर पावसात वेंगुर्ले दाभोली नाका ते रामेश्वर मंदिर करत परत दाभोली नाका येथे काढून समारोप झाला. भारतावर जेव्हा जेव्हा हल्ले झाले तेव्हा सीमेवरील सैनिकांच्या पाठीशी देशातील प्रत्येक नागरिक उभा राहिला आहे. यापुढेही आपण हीच एकजूट कायम ठेवावी असे आवाहन या प्रसंगी वेंगुर्लेवासीयांनी केले.