रेंबवली, – सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पहाटे जोरदार पावसामुळे घरावर झाड कोसळून एका घराचे नुकसान झाले. श्री. संजय चंद्रकांत वळंजू, रा. रेंबवली यांचे घर पहाटे साडेपाचच्या सुमारास घरावर शेवग्याचे झाड पडल्यामुळे अंशतः नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

आजच्या दिवसभरात परिसरात १८० मिमी पावसाची नोंद झाली असून, यामुळे आतापर्यंतचे एकूण पर्जन्यमान ५८८ मिमी इतके झाले आहे. नुकसानीचे प्राथमिक अंदाजानुसार आर्थिक नुकसान सुमारे १०,००० रुपये इतके झाले आहे. संबंधित घटनेची पंचनामा यादी लवकरच सादर करण्यात येणार आहे.












