सावंतवाडी । प्रतिनिधी :
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार -२०२३ निरवडे गावातील सौ. प्रियांका प्रमोद गावडे, माजी सभापती, सावंतवाडी पंचायत समिती आणि श्रीमती सुप्रिया जाधव , माजी सरपंच, निरवडे यांना प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मान पत्र, शाल आणि श्रीफळ असे आहे.
यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी स्वाक्षरी केलेले सन्मानपत्र, जे सावंतवाडी तालुक्यातील ६३ गावामधून निवड करून निरवडे ग्रामपंचायत हस्ते पुरस्कार विजेत्यांना देण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार वाहून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी सरपंच सौ. सुहानी गावडे, उपसरपंच श्री अर्जुन पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य श्री धर्माजी गावडे, सौ अंगरीका गावडे, सौ आनंदी पवार, कृषि सहाय्यक सौ सावंत, कृषी अधिकारी सौ देसाई, तलाठी सौ कुडतरकर, महिला व बालविकास अधिकारी सौ मोरे, निरवडे जि प शाळा मुख्याध्यापिका सौ पास्ते मॅडम , सीआर, आशा, आरोग्य सेविका आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामविस्तार अधिकारी श्रीमती सुनीता कदम यांनी केले, प्रास्ताविक सौ मोरे मॅडम यानी तर शुभेच्छा सरपंच सौ सुहानी गावडे यांनी दिल्या. श्री धर्माजी गावडे यांनी पुरस्कारथी विषयी विस्तारपूर्वक अनुभूव सांगितले. त्यावर अतिशय नम्रपणे सौ प्रियंका गावडे आणि श्रीमती सुप्रिया जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या निमित्ताने कृषी अधिकारी सौ देसाई आणि सौ सावंत यांनी काही प्रात्यक्षिक दाखवीत येणाऱ्या भात पीक लागवडी विषयी विशेष मार्गदर्शन केले. तसेच बँक ऑफ इंडिया तळवडे शाखेचे मॅनेजर यांनी विविध योजना विषयि मार्गदर्शन केले आणि निरवडे गावातील बँक ऑफ इंडिया च्या प्रतिनिधी सौ प्रियंका तुकाराम गावडे यांच्या बँक काउंटर चे अधिकार आणि उपयुक्तता विषयी माहिती दिली.
Sindhudurg











