बांदा कट्टा कॉर्नर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळातर्फे वृक्षारोपण

बांदा l प्रतिनिधी :जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बांदा कट्टा कॉर्नर येथील सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यात हापूस आंब्याची कलमे आणि अन्य औषधी वनस्पती लावण्यात आल्या.

 

यावेळी मंडळाचे अध्यक्ष संजय नाईक, ज्येष्ठ सदस्य भाऊ वळंजू, गुरु धारगळकर, गुरुनाथ मेस्त्री, बाबा काणेकर, रवींद्र सावंत, सुरज राऊळ, बाळा आकेरकर, नाना शिरोडकर, सिद्धेश वेंगुर्लेकर, बांदा पोलीस स्टेशनचे श्री. मुणगेकर, बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग, महावितरणचे श्री. कांबळी आदी उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष संजय नाईक यांनी सर्वांचे आभार मानले.