तलाठी भरतीसाठी मदतकक्षाची स्थापना

रत्नागिरी : तलाठी पद भरतीची जाहिरात प्रसिध्द झाल्यावर जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी व आस्थापनेवरील तलाठी पदभरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी तसेच त्यांना मार्गदर्शन करण्याकरिता मदत कक्ष (हेल्प डेस्क) स्थापन करण्यात येत आहे. त्याची माहिती पुढीलप्रमाणे.
“जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी” मदत कक्ष (हेल्प डेस्क)
शाखेचे नाव- आस्थापना शाखा, दूरध्वनी क्रमांक (०२३५२) २२३५७३
ई-मेल आयडी rtg_est@rediffmail.com
या मदत कक्षाशी अथवा दूरध्वनीवर इच्छुकांनी संपर्क साधावा, असे आवाहन महसूल प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.