अशफाक हाजू यांनी स्वकतृत्वाने समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली-रवींद्र तथा आण्णा सामंत

शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशफाक हाजू यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

राजापूर (प्रतिनिधी): प्रामाणिकपणे व निष्ठेने काम करत आपल्या व्यवसायात प्रगती साधताना स्वकतृत्वाने अशफाक हाजू यांनी समाजात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे, आणि निश्चितच ही बाब आंम्हा सामंत कुटुबीयांसाठी अभिमानास्पद अशी आहे असे गौरोवोद्गार ज्येष्ठ उद्योजक रवींद्र उर्फ आण्णा सामंत यांनी अशफाक हाजू यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळयात काढले.

शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशफाक हाजू यांचा वाढिदवस राजापूर तालुका शिवसेना व अशफाक हाजू मित्र मंडळाच्या वतीने मंगळवारी १० जून रोजी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राजापूर शहर व तालुका परिसरासह रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील अनेकांनी हाजू यांना शुभेच्छा दिल्या.

पन्हळे येथील हॉटेल सिध्दांतच्या सभागृहात झालेल्या अभिष्टचिंतन सोहळयाप्रसंगी आण्णा सामंत बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडीत, सिंधुदुर्गातील शिवसेना उपनेते संजय आंग्रे, विलास चाळके, भाजपा जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर, राजापूर तालुका बार असोशिएशनचे अध्यक्ष एड. शशिकांत सुतार, शिवसेना युवा नेत्या अपुर्वा सामंत, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरूप, शिवसेना तालुका प्रमुख दीपक नागले, संजय संदेश सावंत पटेल, दिनेश जैतापकर, भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष भास्कर सुतार, राजापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष संजय ओगले, सीईओ शेखरकुमार अहिरे, संचालक प्रसाद मोहरकर, विवेक गादीकर, राजापूरचे माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी, शिवसेनेचे भरत लाड, दीपक बेंद्रे, सौ. दुर्वा तावडे, ज्येष्ठ पत्रकार महेश शिवलकर, राजापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना आण्णा सामंत यांनी व्यवसायाच्या माध्यमातुन राजापुरात त्या काळात कै. भाईसाहेब हातणकर यांचे मोलाचे सहकार्य होते, त्या काळात आपल्याला अशफाक सारखा तरूण भेटला, त्याला दिलेले काम, व्यवसाय त्याने प्रामाणिकपणे केला व आपले नाव निर्माण केले. तो आमच्यामुळे नाही तर तो स्वकतृत्वाने मोठा झाला आहे, उलट त्याच्यामुळे आमचेही नाव राजापुरात कानाकोपऱ्यात पोहचले असेही त्यांनी नमुद केले. आमच्या कुटुंबातील तो एक महत्वाचा भाग असून त्याचे अभिष्टचितंनासाठी झालेली ही गर्दी त्याचे समाजात एक माणूस म्हणून निर्माण केलेले स्थान काय आहे हे सांगते असेही आण्णा सामंत यांनी यावेळी नमुद केले. याप्रसंगी एड. शशिकांत सुतार, रवींद्र नागरेक, संजय आंग्रे आदींसह अनेकांनी मनोगत व्यक्त करत हाजू यांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी राजापूर शहर व तालुका परिसरातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी, विविध राजकिय पक्षाचे पदाधिकारी, ठेकेदार संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी हाजू यांना शुभेच्छा दिल्या.

तर राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत, आमदार किरण सामंत यांनी हाजू यांना दुरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.