Muslim Samaj Vikas Sangh Ratnagiri will honor the award of special meritorious person
रत्नागिरी | जमीर खलफे : जिल्ह्यातील मुस्लीम समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्तींना त्यांच्या कार्यक्षेत्रात दिलेल्या बहुमुल्य योगदानाबद्दल तसेच कर्तृत्वाबद्दल मुस्लिम समाज विकास संघ रत्नागिरीतर्फे सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये विविध क्षेत्रांमध्ये सन 2023 मध्ये विशेष यश संपादन केलेल्या व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
मुस्लिम समाज विकास संघ जिल्हा रत्नागिरी यांच्याकडून पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये विविध 24 क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मुस्लिम समाजातील व्यक्तींनी पुरस्काराकरीता आपली माहिती 10 जूनपर्यंत खाली दिलेल्या क्रमांकावर पाठवावी असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.
खालील सन्मानितांमध्ये फक्त रत्नागिरी जिल्ह्यातीलच मुस्लिम स्त्री-पुरूषांचा समावेश असावा, असे सांगण्यात आले आहे. यामध्ये -1) कारी, फाजील, मुफ्ती, कामील, अल्लामा, 2) इयत्ता दहावीमध्ये बोर्डात पहिले तीन क्रमांकामध्ये आलेले विद्यार्थी, 3) तीनही शाखेमधील इयत्ता बारावीमध्ये बोर्डात पहिले तीन क्रमांकामध्ये आलेले विद्यार्थी, 4) विद्यापीठात पहिले तीन क्रमांकामध्ये आलेले सर्व शाखेतील विद्यार्थी, 5) एमबीएस, एमडी, डीएनबी, एमपीटी, डॉक्टर्स एम. फॉर्म, 6) एमई/एम. टेक, बीई/बी. टेक. इंजिनीयरींगच्या सर्व शाखेतील विद्यार्थी, 7) आयआयटी/आयआयएम, 8) एनडीएन पासआऊट, 9) युपीएस्सी/एमपीएस्सी पासआऊट, 10) कमर्शिअल पायलट, 11) ग्रॅज्युएशन/पोस्ट ग्रॅज्युएशन लेव्हलवर सर्व शाखेतील कुठल्याही एका विषयात मिळविलेले सुवर्ण पदक, 12) कुठल्याही शाखेतील पीएच्डी प्राप्त, 13) पोलीस खात्यात अधिकारी म्हणून नियुक्ती, 14) मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन/चीफ इंजिनियर पदावर नियुक्ती, 15) राज्यस्तरीय व ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित लेखक आणि कवी, 16) चार्टर्ड अकाउंटंट 17) आर्किटेक्चर, 18) राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शिक्षक, प्राध्यापक, 19) एलएलबी/एलएलएम, 20) कुठल्याही क्षेत्रातील राज्यपाल किंवा राष्ट्रपती पारितोषिक विजेते, 21) शिक्षण क्षेत्रात भरघोस काम केलेली व्यक्ती, 23) शास्त्रज्ञ, 24) राज्य आणि देश पातळीवर खेळत असलेला खेळाडू, 25) राज्य आणि देश पातळीवर पुरस्कार प्राप्त पत्रकार, 26) कला क्षेत्रातील नावाजलेले व्यक्तीमत्व. सत्कारासाठी सन 2023 पासूनच विचार करण्यात येईल, असेही नमूद करण्यात आले असून या संदर्भातील अधिक माहितीसाठी निमंत्रक रत्नागिरी मुस्लीम समाज विकास संघ, जिल्हा रत्नागिरी यांच्याशी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
7350431111/8879425333/9370269266











