सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र येथे ‘विकसित कृषि संकल्प अभियान अंतर्गत विविध कृती कार्यक्रम’ संपन्न

रत्नागिरी :भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांचे मार्गदर्शन नुसार ‘विकसित कृषि संकल्प अभियान’ तथा ‘भारत कृषि जागरण यात्रा’ डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली आणि अंतर्गत विविध संशोधन केंद्रांमार्फत दिनांक २९.०५.२०२५ ते १२.०६.२०२५ या कालावधीत परिसरातील ग्रामीण शेतकरी करिता विविध मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत. याच अनुषंगाने ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी’ येथील शास्त्रज्ञांची टिम द्वारे  रत्नागिरी परिसरातील ५ गावांमधील शेतकऱ्यांना, मत्स्य शेतकऱ्याना, मच्छिमार बांधवांना, मत्स्य व्यवसायिकांना ‘विकसित कृषि संकल्प अभियान’ बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी’ येथील शास्त्रज्ञांमार्फत दिनांक ९ जून रोजी मुक्काम नाचणे, जे. के. फाईल्स जवळील श्री. सुयोग भागवत यांचे शोभिवंत मासे विक्री आणि संवर्धन प्रकल्पावर भेट देऊन मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. यावेळी काही होतकरू तरुण आणि शोभिवंत मत्स्य व्यवसाईक सुद्धा हजार होते. याच दिवशी मुक्काम खेडशी-गयाळवाडी येथील नव-खेकडा शेती उद्योजक श्री. सुनिल घडशी यांच्या नविन गोड्या पाण्यातील खेकडा संवर्धन प्रकल्पाला सुद्धा भेट देण्यात आली.

दिनांक १० जून रोजी ‘श्री भगवती मच्छिमार सहकारी संस्था मर्यादित, किल्ला, ता. रत्नागिरी’ येथे भेट देऊन, सोसायटीच्या पदाधिकारी आणि सभासदांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष श्री. सुधाकर मोंडकर, सचिव श्री. मिलिंद शिरवडकर आणि सदस्य श्री. श्रीकांत सारंग यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विशेष सहाय्य केले.

दि. ११ जून रोजी मुक्काम केळये-मजगाव येथील सौ. निशिगंधा पवार यांचेकडे मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. त्यांनी मांडव पद्धतीने खाडीमध्ये सागरी शेवाळ संवर्धन प्रकल्प जल-जिविका संस्थेच्या मदतीने सुरु केला होता. यावेळी त्यांना येणारे अडथळे याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी शिरगाव, रत्नागिरी येथील जल-जिविका संस्थेचे पदाधिकारी श्री. चिन्मय दामले, श्री. राज पवार, श्रीम. सृष्टी सुर्वे व श्रीम. समृद्धी सनगरे यांनी सुद्धा उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला.

दिनांक १२ जून रोजी फगरवठार, शिरगाव, ता. रत्नागिरी येथील सुकी मासळी उद्योजक श्रीम. समृद्धी किल्लेकर यांचे घरी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी सुकी मासळी पदार्थ उत्पादन आणि विक्री मध्ये येणारे अडथळे जाणून घेवून त्यावर मात करण्याकरिता मार्गदर्शन करण्यात आले.

सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरीता डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोलीचे आदरणीय कुलगुरू डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, तसेच सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरीचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. आशिष मोहिते यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रम समन्वयाचे काम प्रा. सचिन साटम (सहाय्यक संशोधन अधिकारी) यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरीता डॉ. आसिफ पागारकर (सहयोगी संशोधन अधिकारी व प्राध्यापक), डॉ. हरिष धमगये (अभिरक्षक व प्राध्यापक), प्रा. नरेंद्र चोगले व प्रा. सचिन साटम (सहाय्यक संशोधन अधिकारी), श्रीम. व्ही. आर. सदावर्ते (जीवशास्त्रज्ञ) तसेच श्री. रमेश सावर्डेकर (वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक), श्री. महेश किल्लेकर (यंत्र चालक बोट) व श्री. दिनेश कुबल (बोटमन), श्री. स्वप्नील आलीम यांनी विशेष सहभाग नोंदविला. तसेच या कार्यक्रमाकरिता श्री. मनिश शिंदे (मत्स्यालय यांत्रिक), श्रीम. जाई  साळवी (वरिष्ठ लिपिक), श्री. सचिन पावसकर (लिपिक), श्री. सुहास कांबळे (शिपाई), श्री. सचिन चव्हाण (मजूर), श्री. प्रवीण गायकवाड (क्षेत्र संग्राहक), श्री. तेजस जोशी, श्री. योगेश पिलणकर, श्री. उल्हास पेडणेकर व श्री. प्रशांत पिलणकर यांनी विशेष परिश्रम घेतले.