जलसमृद्ध गाव संकल्प अंतर्गत कलमठ ग्रामपंचायतचा स्तुत्य उपक्रम.
पावसाळा पूर्व तयारी म्हणून गावातील सर्व गटारे सफाई काम युद्ध पातळीवर.
सरपंच, उपसरपंच ,सदस्य ,ग्रामविकास अधिकारी यांच्या कामाचे होते कौतुक
कणकवली (प्रतिनिधी) कलमठ गावातील सर्व सार्वजनिक विहिरीतील गाळ उपसणे , नूतनीकरण करणे ,लोखंडी जाळी बसवणे , रंगरंगोटी करणे ,गटार सफाई करणे अशी पावळ्या पूर्वी करायची कामे कलमठ ग्रामपंचायतने पूर्ण केली आहेत. 15 वित्त आयोग मधून ही कामे हाती घेतली होती विहिरी दुरुस्तीची कामे देखील सुरु केले होते.कलमठ बाजारपेठ येथील तांबट विहीर ,प्रदीप कांबळी यांच्या घरा नजीक असलेली विहीर , कुंभारवाडी विहीर , मठकर कॉम्प्लेक्स विहीर दुरुस्ती,गाळ उपसणे व रंगकाम आदी कामे पूर्ण झाली आहेत. या विहिरींवर लोखंडी जाळी बसवली जाणार आहेत. आज सरपंच संदीप मेस्त्री ,उपसरपंच स्वप्नील चिंदरकर ,ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुडतरकर,सदस्य नितीन पवार यांनी सर्व कामाची पाहणी केली . गेल्या 15 दिवसात सरपंच संदीप मेस्त्री स्वतः कर्मचाऱ्या मार्फत गावातील गटारे सफाई करून घेत असून पावसाळा पूर्वी गावातील सर्व गटारे सफाई ,विहिरी नूतनीकरण करण्याचे काम पूर्ण होईल असा विश्वास सरपंच संदीप मेस्त्री व उपसरपंच स्वप्नील चिंदरकर यांनी व्यक्त केला. दरम्यान ग्रामस्थांनी ग्रामपंचायतने हाती घेतलेल्या कामां बद्दल समाधान व्यक्त केले आहे .यावेळी जितू कांबळे ,राजू कोरगावकर, प्रदीप कांबळी उपस्थित होते .












