गौरव पोंक्षे l माखजन : संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे ग्रामपंचयतीतर्फे गावातील रहिवाशांना रोपांचे वाटप करण्यात आले.
सामाजिक वनीकरण विभागाकडून ही झाडांची रोपे मिळवण्यात आली.आंबव पोंक्षे ग्रामपंचायतीचे सरपंच शेखर उकार्डे यांनी विशेष प्रयत्न केले.
प्रत्येक घरपटी पाच खैराची रोपे देण्यात आली.लागवडीतून भविष्यात चांगले उत्पन्न ग्रामस्थांना मिळावे या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे सरपंच शेखर उकार्डे यांनी संगितले.
दरम्यान या वाटपाप्रसंगी सरपंच शेखर उकार्डे,माजी सरपंच व विद्यमान सदस्या सौ प्रिया सुवरे,संदेश पोंक्षे,सुप्रिया सुतार,दामिनी विभूते,सौ पूर्वा भुवड,संतोष भुवड आदी उपस्थित होते.











