गणेशोत्सवामध्ये बोरिवली-शिवतर जादा फेरी

खेड (प्रतिनिधी)

शिवतर ग्रामस्थ शिक्षण संस्था मुंबई आणि शिवतर
ग्रामस्थ विकास मंडळाने एसटी महामंडळाकडे गणेशोत्सवात बोरिवली-शिवतर जादा बसफेरी सोडण्याची केलेली मागणी मान्य करण्यात आली आहे.

त्यानुसार २३ ऑगस्टपासून बोरिवली-शिवतर जादा बसफेरी धावणार आहे. बोरिवली येथून रात्री १०.१५ वाजता सुटेल. शिवतर येथून सकाळी १०.१५ वाजता सुटेल. एसटी बसचे ऑनलाईन बुकिंग चालू झाले आहे. शिवतर, जामगे, आंबये, मुरडे, चाकाळे, भडगाव येथील प्रवाशांनी सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.